मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
महागाईच्या पुरात बाजार गेला वाहून  Search similar articles
अमेरिकी बाजारात झालेली विक्रमी पडझड, आणि महागाईदराने साडे अकराचा पल्लाही ओलांडल्यामुळे या नकारात्मक प्रवाहात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी अक्षरशः वाहून गेला.

सत्राच्या आरंभीच अमेरिकी बाजारात झालेल्या पडझडीचे वृत्त बाजारात येऊन थडकल्याने बाजाराची सुरुवात घसरणीनेच झाली होती. यात बीएसईचा निर्देशांक 620 अंशांनी तुटत दहा महिन्यांनंतर बाजार 14 हजार अंशांखाली आला, तर नॅशनल स्टॉक एक्सेंजमध्येही 179 अंशांची पडझड झाली.

बाजारावर इतका नकारात्मक परिणाम दिसून आला, की शेअर बाजारातील 30 पैकी एकाही कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 142 डॉलरच्या जवळपास जाऊन खेटल्याचा परिणामही बाजारावर दिसून आला. यातच महागाईदर वाढल्याने आणि तज्ज्ञांनी तो 12 टक्क्यांपर्यंत जाण्याच्या तयारीत असल्याचे भाकीत केल्याने दलाल स्ट्रीटवर निराशेची लाट आली आहे.
आणखी
अमेरिकी बाजारही धाराशाही
बीएसई अध्यक्ष शेखर दत्ता यांचा राजीनामा?
बाजार २७५ अंशांनी घसरला
बाजार 206 अंशांनी वधारला
आठवड्याच्या शेवटीही बाजारात घसरणं
बाजारात पुन्हा किरकोळ वाढ