मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > अर्थजगत > शेअर बाजार > शेअर बाजाराची झेप
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शेअर बाजाराची झेप
वार्ता
नुकत्याच संपलेल्या आठवड्यात गुंतवणूकदार आणि कंपन्यांचे दिवाळं वाजवणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने सोमवारी पुन्हा एकदा गगनभरारी घेतली. आज बाजारात 572 अंशांची तर निफ्टीत 175 अंशांची वाढ झाली.

आर्थिक मंदीचा फटका चीनलाही असह्य झाल्याने चीनने बाजारात 586 कोटी ओतल्याने आशियाई बाजार आज कात टाकते झाले.

चीनच्या या घोषणेनंतर भारतीय गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, भारतीय बाजारात याचा परिणाम आज दिसून आला.

बाजारात आज सुरुवातीच्या सत्रापासूनच चांगलीच वाढ दिसून आली. शुक्रवारच्या तुलनेत आज बाजार 10154.56 अंशांवर सुरू झाला आणि पाहता-पाहता 10570.58 अंशांवर येऊन ठेपला. काही किरकोळ घसरण बाजारात झाली खरी, परंतु बंद होताना 571.87 अंश अर्थात 5.74 टक्क्यांचा फायदा कमावत बाजार 10536.16 अंशांवर बंद झाला.
संबंधित माहिती शोधा
आणखी
टिसीएस- गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय
शेअर बाजारात पुन्हा पडझड
मुंबई शेअर बाजाराला ब्रेक
रिलायन्स पेट्रोचा समभाग आकर्षक
सेन्सेक्स दहा हजारावर
मुंबई शेअर बाजाराची नवीन भरारी