मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार > मुंबई शेअर बाजाराला मंदीचा तडाखा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुंबई शेअर बाजाराला मंदीचा तडाखा
वार्ता
नवीन आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी अर्थात सोमवारी मुंबई शेअर बाजारात झालेल्या चांगल्या उलाढालीने गुंतवणूकदार सुखावला असतानाच आज मंगळवारी मात्र पुन्हा एकदा शेअर बाजारात तुफान पडझड झाल्याने आशियाई शेअर बाजारात अजूनही अनिश्चितता कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.

मंगळवारी बाजारात झालेल्या घसरणीने गुंतवणूकदार उदास झाला आहे. आज बीएसईत 696 अंश तर निफ्टीत 210 अंशाची घसरण झाली आणि बाजार क्रमशः दहा आणि तीन हजारांखाली आला.

चीनने आपल्या बाजारात काल केलेल्या मोठ्या गुंतवणुकीनंतर आशियाई बाजारात पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली होती, परंतु या दिवाळीची चमक एक दिवसापेक्षा अधिककाळ टिकू शकली नाही.

निर्देशांक कालच्या 10536.16 अंशांच्या तुलनेत 130 अंशांखाली 10405.39 अंशांवर उघडला आणि इथेच त्याला दातखीळ बसली. यापुढे तो झेप घेऊ शकला नाही.
संबंधित माहिती शोधा
आणखी
शेअर बाजाराची झेप
टिसीएस- गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय
शेअर बाजारात पुन्हा पडझड
मुंबई शेअर बाजाराला ब्रेक
रिलायन्स पेट्रोचा समभाग आकर्षक
सेन्सेक्स दहा हजारावर