मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज दिवस संपेपर्यंत ४३० अंशांनी कोसळला. परकीय गुंतवणूकदार संस्थांनी आज बड्या बड्या शेअर्सची जोरदार विक्री केली. रिलायन्ससह अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स त्यांनी आज विकून टाकले.
त्यामुळेच निर्देशांक आज ४३० अंशांनी ओसळून ९ हजार ४०९.८१ अशांवर बंद झाला. निफ्टीही १२५.६५ अंशांनी कोसळून २८१३ अंशांवर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रिज, इन्फोसिस टेक्नॉलॉजीस यांना आज मोठा फटका बसला. |