गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ९६३१ वर उघडला. आठवडयातील सेन्सेक्सचा उच्चांक १०५७० होता तर नीचांक ९२६७ होता. सप्ताहाअखेर सेन्सेक्स ९३८५ अंशावर बंद झाला. या आठवडयात सेन्सक्समध्ये २४६ अंशाची घसरण झाली. या आठवडयातदेखील सेन्सेक्स ८७०० अंशाच्या वर ९३८५ बंद झाला असल्याने ८७०० अंशाच्या साप्ताहिक पातळीला दुजोरा मिळाला आहे. सेन्सेक्सच्या पुढील हालचालीच्या दृष्टीने १०६३१ ते ८५१० या मधल्या Retracement Level चा विचार केल्यास ९३२० आणि ९८५० या महत्वाच्या आधार पातळी दिसून येतात. त्यामुळे सेन्सेक्स या स्तरांच्या जवळपास जमवणुकीचे सत्र चालू ठेवेल. या अगोदरच्या विश्लेषणात नमूद केल्याप्रमाणे जोपर्यंत १०७०० अंशावरचा प्रतिकार निर्णायकरितया दूर केला जात नाही तोपर्यंत बाजार निस्तेज राहील.आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाची विक्रमी घसरण भारतीय तेल कंपन्याना हितावह आहे. त्यामुळे सद्य स्थितीत हिंदूस्थान पेट्रोलियमचा समभाग गुंतवणुकयोग्य वाटतो. २१० रूपयांवरती वरती स्टॉप लॉस ठेवून गुंतवणुकीचा विचार करावा. समभागाचे पुढील लक्ष्य २४० असण्याची शक्यता आहे. ( या स्तंभात व्यक्त केलेली मते विविध स्त्रोतांच्या अभ्यासातून आलेली आहेत. ती अचुक असतीलच असे नाही. त्यामुळे कृपया, गुंतवणुकदारांनी स्वतःच्या जोखमीवर गुंतवणूक करावी. त्यास स्तंभलेखक वा वेबदुनिया जबाबदार रहाणार नाही.) |