अशियाई बाजारात झालेल्या घसरणीने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय बाजारात आज तुफान पडझड झाली. बीएसईचा निर्देशांक 322.77 अंशांनी घसरत 2005 नंतर प्रथमच 8451.01 अंशांवर बंद झाला. एनएसईच्या निफ्टीतही 82 अंशांची घसरण झाल्याने तो 2553.15 अंशांवर बंद झाला. अमेरिकी बाजारात काल मोठी घसरण झाली यानंतर आज अशियाई बाजारावर याचा परिणाम दिसून आला.महागाई दर घसरल्यानंतरही बाजारात अजूनही गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने पडझड सुरु असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आजही बँकिंग, धातू, गॅस आणि ऑटोमोबाईल कंन्यांच्या शेअर्समध्ये तुफान विक्री झाली. |