मंगळवारी कोसळलेल्या मुंबई शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला ठरला. बीएसईमध्ये आज 507 अंशांची तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 147 अंशांची वाढ बाजारात झाली.
बीएसईचा निर्देशांक 3.29 टक्क्यांनी वधारत 15,912.13 अंशांवर तर निफ्टी 3.22 टक्क्यांनी वधारत 4,710.80 अंशांवर बंद झाला.