17 हजारी बाजारात चढ-उतार

मुंबई , सोमवार, 16 नोव्हेंबर 2009( 16:40 IST )
मुंबई शेअर बाजाराने आज 17 हजारांचा पल्ला गाठला असला तरी सुरुवातीपासनूच बाजारात सापशिडीचा खेळ दिसून आला. बीएसईचा निर्देशांक 161 अंशांच्या वाढीसह 17009 अंशांवर तर निफ्टी 52 अंशांच्या वाढीसह 505- अंशांवर बंद झाला.
रियल्टी, ऑटो, आणि मेटल क्षेत्रात जोरदार खरेदी दिसून आली. मारुती, डिएलएफ, स्टरलाईट, या शेअर्सचे भाव वधारले होते, तर टीसीएस, एनटीपीसी, आणि इंफोसिसला नुकसान झाले.
निफ्टीतही मारुती, सुजलॉन, रिलायन्स पावर, या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.