मंथन | बाबा आमटे | मराठी दिन | गांधी जयंती | सावरकर | ब्लॉग-कॉर्नर
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आज-काल » मंथन » इंटरव्ह्यू मोलकरणीचा
Feedback Print Bookmark and Share
 

molkarin
ND
अग शरयू मी बोलतकाय बसलेय आज इंटरव्ह्यू आहे ना ! चल मी निघते. हो अन् तुझ्या मोलकरणीलाही पाठव हॉ!
अपर्णा घरी येते, दारावरची बेल वाजते.
अपर्णा - थांबा उघडते
समोर रखमा मी कामवाली. अग बाई किती अपटूडेट अन् मेकअप पण केवढा ! मनात म्हटलं कोण म्हणेल हिला कामवाली ! हळूच आपल्या साडीकडे बघून घेतलं.
रखमा - मी रखमा जी ! 24 फ्लॉट मधल्या मेमसाबजीनी तुमचं काम सांगितलाय ना म्हणून आली. अ. अग कोण त्या बेलसरे.
रखमा - नाही जी त्या मोठं नाव हाय त्यांच
अपर्णा - बरं असू दे हे बोल काम काय काय करशील काय घेशील अन् केव्हा येशील ?
रखमा - बघा बाई मी त्या 24, 25, 28 फ्लॉट मधी काम करतो. एका ठिकाणी हजार, दुसर्‍या ठिकाणी दीड हजार अन् तिसर्‍या ठिकाणी पाचशे रुपये नुसता भांडी अन् स्वयंपाक घर पुसतो. दोन घरी झाडू पोचा अन् भांडे अन् पुसणं पासण.
अपर्णा - हे बघ रखमा माझ्या कडे पोचा लावायचा अन् भांडी घासायची सका‍ळी मी झाडून ठेवते काय घेणार?
रखमा - सहाशे रुपये जी अन् दोन वाजे पावेता येणार आठ दिवसांत एक सुट्टी मग आजारी वगैरे मिळून सहा एक सुट्ट्या होतात, डॉक्टरकडे जावं लागत मला तपासाले.
molkarin
ShreyaWD
अपर्णा - हे बघ चारशे देईन सुट्ट्या कमी करायच्या आणि 12 वाजेपर्यंत काम करून जयाचं. 12 नंतर मी शाळेत जाते.
बाई मला कस जमलं माझे साहेब कामावर गेल्यावर मी घरून निघतो तवा अकरा वाजते मग 24 फ्लॅट मध्ये 1 वाजतो, 25 मध्ये 2 तर होतातच आनी तिसर्‍या घरी 3 वाजते त्या नंतर तुमच्या कडे येन जमल.
अपर्णा - हो का गं मग मी दुसरी बघते. रखमा जाते. थोड्या वेळात सखू बाई येतात.
अपर्णा - कोण काम करायला? काय नावं?
सखू बाई - हो जी म्या सखूबाई त्या पांढरीपांडे बाई आहे ना! त्यांनी पाठवलंय - म्हने जा ग बाई त्यांना लई त्रास होतोये काम करायला खूप मोलकरणी झाल्या कूनी बी टिकत नाही तर तू कर बाई.
अपर्णा - हो का ग मला वाटलंच की जाताना रखमा काही तरी हिला बोलेल तेव्हा हिला तिनं पढवलं असणार. पण बाई वागायला बरी दिसली.
म्हटलं सखू बाई काम करणार? काय घेणार अन् केव्हा येणार?
सखू बाई - बाईजी मी पहिले जी घर है ती करून मग दोन वाजे पावतो येऊ सकतो. घेणार आठशे रुपये बघा धुणं भांडे, झाडू पोचा अन् इतर वरचे काम - बघा जी माझं काम साफ हे कट कट आवडत नाही मले आणी आठ दिवसाने दोन सुट्या करतो म्यॉ.