आपल्या भारतीय संस्कृतीनुसार विशिष्ट दिनी अथवा तिथीला आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत असतो. आपले आई-वडील तसेच वरिष्ठ बंधू यांच्या प्रती आदर व कृतज्ञता यांचा भाव मनुष्यप्राण्यांमध्ये दिसून येते. हाच आदरभाव ते अनंतात विलीन झाल्यानंतर देखील कायम राहतो. पितृपंधरवडा त्यासाठीच पाळला जातो. या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
चीनमध्ये पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता दाखवण्याचा सोहळा साधारण एक महिना चालतो. चिनी चंद्र वर्षाचा सातवा महिना (जुलै-ऑगस्ट महिन्याचा काळ) पूर्वजांना समर्पित केलेला असतो. या महिन्याचा पंधरावा दिवस 'पूर्वज दिवस' किंवा 'प्रेत दिवस' म्हणून साजरा केला जातो. चिनी संस्कृतीत त्यांचा 'चोंगयांग' म्हटले जाते तर बौद्ध अनुयायी त्याला 'उल्लमबाना' म्हणतात.
ND
या दोन्ही शब्दामध्ये फारसे अंतर दिसत नाही. संपूर्ण महिनाभर आपण पित्तरांना घरी बोलावून त्यांनी विविध लज्जतदार पदार्थ खाऊ घातले जातात. त्यांना चपला, कपडे, दागदागिने आदी वस्तू पूर्वजांच्या प्रती त्यांना अर्पण केल्या जातात. असे मानले जाते की, पितृपक्षात इहलोकाची द्वारे खुली होतात व तेथे राहणारे आपले पूर्वज पृथ्वीलोकात येऊन आपापल्या वंशजामध्ये राहून भोजन ग्रहण करतात. ज्या आत्माला जाण्यासाठी घर नसते ते भुकेल्या अवस्थेतच भटकत राहतात. असे हे भटकणारे आत्मे फार धोकादायक असतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी सामूहिक भोजनाचा कार्यक्रम केला जातो. पितृ पंधरवडा समाप्त झाल्यानंतर कागदाचा दिवा तयार करून नदीच्या प्रवाहात सोडला जातो. कारण त्या दिव्याच्या प्रकाशात आत्मा पुन्हा व्यवस्थित इहलोकात जाऊ शकतील.
चीनमध्ये आणखी एक पर्व साजरे केले जाते त्याला 'क्विगमिंग' पर्व असे म्हटले जाते. 'चोंगयांग' हे आपल्यापेक्षा वरिष्ठ व्यक्तीच्या मरणोत्तर त्यांच्या स्मृतीत केले जाते तर 'क्विंगमिंग' हे पर्व प्रत्येक वय व पिढीतील दिवंगत नागरिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ केले जाते. या विशिष्ट दिवशी स्मशानभूमीत जाऊन तेथील जागेची साफसफाई केली जाते व दिवंगत आत्म्यास नैवेद्य व चहा अर्पण केला जातो.
जपानमधील 'ओबोन' पर्व हे चीनमधील 'चोंगयांग' या पर्वाशी मिळतेजुळते आहे. मात्र 'ओबोन' हे पर्व केवळ तीन दिवस साजरे केले जाते. चंद्र वर्षांच्या सातव्या महिन्याच्या तेराव्या दिवशी झराच्या बाहेर विशिष्ट प्रकारचे दिवे लावले जातात. त्यावेळी लोक पितरांना आमंत्रित करण्यासाठी स्मशानभूमीत जातात. असे मानले जाते की, हे तीन दिवस आपले पूर्वज आपल्या परिवारात राहतात. या पर्वाच्या वेळी जपानी लोक कुठेही असले तरी सुटी घेऊन घरी येत असतात. या तीन दिवसांमध्ये पितरांना नैवेद्य दाखविला जातो व त्यावेळी विशिष्ट प्रकारचे नृत्यही केले जाते. त्याला 'बोन ओदोरी' म्हटले जाते. महिन्याच्या तेराव्या दिवशी घरी आलेल्या पूर्वजांना महिन्याच्या पंधराव्या दिवशी सायंकाळी रवाना केले जाते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी दिवे प्रज्वलित करून नदीच्या प्रवाहात सोडले जातात.