मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे, अशी भीती गेल्या अनेक वर्षांपासून वाटते आहे. पण हे फक्त शहरी लोकांना वाटते आहे. कारण शहरात मराठीचं स्वतंत्र रूप नाहीसं होतं आहे. इंग्रजीच्या अतिवापराने ती भ्रष्ट होते आहे. मात्र, खेड्यात मराठी भाषा मूळ आणि शुद्ध स्वरूपात टिकून आहे. त्यामुळे मराठी टिकून राहील का ही भीती शहरांत वाटते. खेड्यात तसे अजिबात चित्र नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांनी केले.
कुसुमाग्रजांची जयंती 'मराठी दिन' म्हणून साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेवाळकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरील मत मांडले.
महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढताहेत......... |