|
मराठीची सक्ती केली पाहिजे- हातकणंगलेकर
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सांगलीत नुकत्याच झालेल्या मराठी साहित्य संमेलनातही मराठीच्या अस्तित्वाचा मुद्दा केंद्रबिंदू राहिला. संमेलनाध्यक्ष प्रा. म.द. हातकणंगलेकर यांच्या भाषणातून तो व्यक्त झाला. त्यांचे हे विचार त्यांच्याच शब्दांत....... मराठी भाषा नष्ट होईल अशी भीती मराठी मनाला ग्रस्त करीत राहिलेली आहे. मराठी भाषेच्या मुमूक्षू अवस्थेची चिंता, ती जिवंत राहील का ही चिंता ज्या काळात पहिल्याने वाटली होती. तिचे स्वरूप व संदर्भ आता बदललेले आहेत. एक संदर्भ उरतो तो म्हणजे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यावर झालेले इंग्रजी भाषा, संस्कृतीचे आक्रमण, विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या काळात या आक्रमणाची सुरवात झाली. एका अर्थाने तिचा स्वीकार झाला. इंग्रजी एक समर्थ, विज्ञाननिष्ठ, व्यक्तिप्रतिष्ठेचा मागोवा घेता येत होता. इंग्रजी, जगाकडे बघण्याची खिडकी होती आजही आहे. थंडगार गोळा झालेल्या अवस्थेतून आपली मुुक्तता ही भाषा, तिच्यातले ज्ञान आणि उदारतवादच करू शकेल असा विश्वास आपल्या आंग्लशिक्षित पहिल्या पिढीला वाटला होता. त्यामुळे चिपळूणकरांनी इंग्रजीचे स्वागत 'वाघिणीचे दूध' असे केले होते. उलट संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास लोकहितवादींना लाकडे फोडीत बसण्याइतका शुष्क वाटत होता.
| | शिक्षणाच्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर भाषाविषयक अभ्यासात हानिकारक बदल झाले. तीन भाषांचा अभ्यास करावा लागू लागला. मराठीचा योग्य पाया तयार होण्यासाठी आवश्यक असलेले पाठांतर, कित्ते, व्याकरण या प्रथा मोडीत निघाल्या. त्यामुळे भाषा नीट तयार होत नाही. |
| |
इंग्रजीच्या वर्चस्वाने मराठीचा र्हास होणार अशी भीती राष्ट्रप्रेमी मंडळींना वाटली होती. कालांतराने मराठी ही राजभाषा नसली तरी तिचे आम्ही सुपुत्र आहोत. आम्ही तिचे पांग फेडू अशी ईर्षा निर्माण झाली. महाराष्ट्र गीते लिहिली गेली. 'भाषोजी मराठी किती मोठी आणि गोटी' असा तिचा गौरव इंग्रज अभ्यासकांनी केला. मराठीत ख्रिस्तपुराण आले पण मराठी भाषेचे, साहित्याचे रूप पालटत गेले. 'नावल' सारखे साहित्यप्रकार, शेक्सपीयरची नाटके, सुनीतासारखा काव्यप्रकार, मेलीयर सारखे फार्स मराठीत आणण्याचा ध्यास लागला. याचा परिणाम म्हणून देशी परंपरा खंडित होते असे दिसले. ज्याला काहीजण वसाहतवादी साहित्य म्हणतात ते निर्माण झाले. सकस देशी परंपरा लोप पावली. पैजेने अमृताची गोडीची बरोबरी करणारी अक्षरे लुप्त झाली. ही स्थित्यंतरे परकीय राजसत्तेखाली झाली. तिनेच व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे आणि हक्काचे नवे तत्त्वज्ञान आपल्याला शिकवले. त्याबळावर आपण ती राजसत्ताही झुगारून देऊ शकलो.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण देशी परंपरेशी पुन्हा नाळ जोडू शकू आणि ती नव्या जमान्याला अनुरूप करू शकू अशी उमेद आपल्याला वाटत होती. पण तसे घडले नाही. शासन व सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी भाषावार प्रांतरचना केली, प्रादेशिक विद्यापीठे स्थापन झाली. शासकीय कारभार प्रादेशिक भाषेतून करावा असे धोरण घोषित झाले. काही भागात इंग्रजी हटावचे नारे उठले. साहित्याच्या क्षेत्रात लोककला, लोकसाहित्य यांना हत्त्व देण्यात आले. सांस्कृतिक कामांना चालना देण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश र्निर्मिती मंडळ, नाटपरिषदेसारख्या संस्था निर्माण झाल्या. सांस्कृतिक क्षेत्रात अनुदाने देण्याची प्रथा सुरू झाली. काळाच्या ओघात या उपक्रमांना सांस्कृतिक, सवंग, संख्यात्मक रूप आले व या क्षेत्रातील गुणवत्ता ओसरू लागली.
| | भाषा म्हणून मराठी नाहीशी होईल असे मला वाटत नाही. बहुजन जनतेचा मराठी बोलणारा फार मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. सकस मराठी साहित्य निर्माण करणारी मंडळी या वर्गातून पुढे येत आहेत. |
| |
शिक्षणाच्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर भाषाविषयक अभ्यासात हानिकारक बदल झाले. तीन भाषांचा अभ्यास करावा लागू लागला. मराठीचा योग्य पाया तयार होण्यासाठी आवश्यक असलेले पाठांतर, कित्ते, व्याकरण या प्रथा मोडीत निघाल्या. त्यामुळे भाषा नीट तयार होत नाही. मराठी पदवीधरांनी लिहिलेल्या मराठीकडे पाहवत नाही, सरकारी कचेर्यातून आलेल्या कागदावरचे मराठी अक्षर उलगडत नाही. ज्या प्राचीन भाषेवर मराठी उभी राहते त्या संस्कृत भाषेचा अभ्यास स्थगित झाला आहे. प्रमाण भाषा ही संकल्पना मागे पडली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इंग्रजीचे महत्त्व कमी न होता वाढतेच आहे. याबाबतीत बहुजन हे अभिजन होत आहेत. त्यांना मराठीचे सोयरसुतक उरले नाही. आर्थिक समृध्दी, सामाजिक प्रतिष्ठा, नेतृत्व यासाठी मराठी उपयुक्त वाटत नाही. मराठी साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ज्यांनी लक्षणीय का केले. त्या श्री. पु. भागवतांना स्वानुभवाने मराठीच्या भवितव्याची चिंता वाटत असे. त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला. अमेरिकन मुलीशी विवाह केला. त्यांच्या मुलांना अर्थातच मराठीचा गंध नाही. त्यामुळे श्री. पु. एकदा खेदाने म्हणाले होते. 'आपल्या आजोबानी मराठी साहित्यासाठी जो जन्भर उद्योग केला, तो माझ्या नातवंडांना कधीच कळणार नाही'
पूर्वाध्यक्ष श्री. अरुण साधूंनाही वाटते की इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आवर घातला पाहिजे. असे असले तरी भाषा म्हणून मराठी नाहीशी होईल असे मला वाटत नाही. बहुजन जनतेचा मराठी बोलणारा फार मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. सकस मराठी साहित्य निर्माण करणारी मंडळी या वर्गातून पुढे येत आहेत. ज्या प्रकारच्या मराठी भाषेला आपण प्रमाण, प्रतिष्ठित मराठी आणि तीच खरी मराठी असे समजत आलो आहोत ती टिकून राहणे म्हणजे मराठी टिकणे असे समजण्यात येते ते किती प्रमाणात खरे आहे? पुणेरी मराठी ते बावनकशी मराठी सोने असे आज तरी म्हणता येत नाही. मराठीच्या संदर्भात गळा काढण्यापूर्वी आपल्याला कोणत्या काळातील, कोणत्या वांग्मय प्रकारातील, कोणत्या वर्गाचे मराठी अभिप्रेत आहे याचा विचार करावा लागेल. प्रा. फडके, खांडेकर, काणेकर, श्री. ना. पेंडसे, खानोलकर, मधु मंगेश, पु.भा. भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रा. गंगाधार गाडगीळ, साने गुरुजी यांचे मराठी का ग्रामीण लेखकांचे मराठी?
| | आपण स्वतःच्या व्यवहारात मराठीची सक्ती केली पाहिजे आणि अर्थातच सुरुवात घरापासून झाली पाहिजे. घरात पत्नीशी, मुलांशी, कुटुंबीयांशी, बाहेर नातेवाईकांशी, मित्रांशी, कामाच्या / व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी (अमराठी असले तरीही) मराठीतच बोलायला पाहिजे. |
| |
१९२६ साली पुणे येथे शारदोत्सव संमेलनात इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठी भवितव्याचे भाकित केले. मराठी भाषा मरणाच्या पंथाला लागली असून पाच पंचवीस वर्षात सर्व महाराष्ट्र मोडकी तोडकी इंग्रजी बोलू लागेल असे भविष्य राजवाड्यांनी व्यक्त केले होते. मराठी भाषा मुमूर्ष झाली आहे अशी त्यांची स्पष्टोक्ती होती. तिच्याशी नंतरचे संमेलनाध्यक्ष सहत नव्हते. राजवाडे यांचे हे अभद्र भविष्य खरे ठरले नाही असे त प्रा. रा. श्री. जोग यांनी १९७४ च्या संमेलनात इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतील लेखात व्यक्त केले. त्यापेक्षा अधिक नम्रपणे १९३३ च्या संमेलनात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर म्हणाले, 'माझ्या मते मराठी भाषा मरणार आहे. या भूतास कायमचे गाडून टाकण्याची आजची वेळ आहे.' दुसर्या कुठल्याही बाहेरच्या भाषेने आक्रमण केले नाही. तरी देश व काल याच्या तावडीत सापडून भाषेचे रूपांतर होऊन एका रूपास मरण येते व दुसर्या रूपाचा जन्म होतो' हे रूपांतर आज मराठी भाषेच्या बाबतीत घडत आहे असे वाटते. १९४६ साली ग. त्र्यं. माडखोलकर म्हणाले, ' कोणतीही भाषा जी उत्कर्षाला चढते ती राज्यसत्तेच्या किंवा विद्यापीठाच्या आश्रयाने नव्हे, तर ज्या बहुजन साजाच्या जिव्हाग्रावर ती वाचत असते आणि हृदयात प्रतिध्वनित होत असते, त्या बहुजन समाजाच्या जीवनाचा जो आणि जिव्हाळा तिच्यात भिनल्यामुळे.'
|
|
|
|
|