मुख्य पृष्ठ वृत्त-जगत » निवडणूक 09 (Election 09)
लोकसभा निवडणूक
'मनसे'ने दिला कॉंग्रेसला 'हात'

ND

मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या मराठी माणसासाठीच्या भांडणात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांगलेच फावले असून मुंबई व परिसरात शिवसेना व भाजप युतीला जोरदार धक्का बसला आहे. मुंबईतील सहाच्या सहा जागांवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
निवडणूक 09
शरद पवारांचे स्वप्न भंगले

ND

नवी दिल्ली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न अखेर यावेळीही भंगले. 'युपीए' सत्तेपर्यंत जाणार नाही, अशी अटकळ बांधून पवारांनी पंतप्रधानपदासाठी लॉबिंग सुरू केले होते. अनेक पक्षांच्या नेत्यांकडून आपले नाव पंतप्रधानपदासाठी वदवूनही घेतले होते. पण आजच्या अनपेक्षित निकालाने पवारांना धक्का बसला आहे.