नवे काही | आयटीच्या जगात
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आयटी/ माहिती व तंत्रज्ञान » आयटीच्या जगात » ट्विटरचा उपयोग बातम्या पहाण्यासाठीच!
Feedback Print Bookmark and Share
 
मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटमध्ये अग्रगण्य ठरलेल्या ट्विटरच्या भारतातील लोकप्रियतेचे रहस्य बातम्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुतांश भारतीय बातम्यांसाठी ट्विटवरचा वापर करत असल्याचे पुढे आले आहे.

प्लग्ड डॉट इन या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. सोळा टक्के भारतीय इंटरनेट युजर नियमितपणे बातम्यांसाठी ट्विटरचे खाते उघडतात. मित्रांशी संपर्क साधण्यासाठी ११ टक्के तर काही तरी शोधण्यासाठी केवळ दहा टक्के युजर ट्विटरचा वापर करतात.

जॅक दोरसे यांनी २००६ मध्ये ही वेबसाईट लॉंच केली. मुंबई हल्ल्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दर पाच सेकंदाला ८० संदेश पाठवले. त्यामुळे मृत आणि जखमींची यादी करणे सोपे गेले.

मध्यंतरी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून शेळ्या-मेंढ्या कोंबल्यासारखा प्रवास होतो असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळेही ट्विटरची लोकप्रियता वाढली. थरूर ट्विटरचा जोरदार वापर करतात. तब्बल तीन लाख लोक त्यांच्याशी या माध्यमातून जोडले गेले आहेत.

ट्विटरने ऑर्कुट, फेसबुक आदींना जोरदार टक्कर दिली आहे. फेसबुकवर ८० लाख तर ऑर्कुटमध्ये साठ लाख लोक लॉगिन आहेत. भारतात ट्विटरवर १४ लाख लोक जोडले गेले आहेत. जर्मनी आणि अमेरिकेनंतर हा तिसर्‍या क्रमांकाचा आकडा आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: ट्विटर