मनसेचा दणका, युतीला धक्का
NDमुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्याने आघाडी सरकारचा फायदा झाला असून, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी सुरू झाली असून, यात मनसेमुळे सेनेला अनेक जागांवर फटका बसला आहे. मनसेच्या मुसंडीने राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सेना- भाजपला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.