मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > मुंबईतली काळरात्र > सेंट जॉर्ज रुग्णालयात रक्ताचा तुटवडा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सेंट जॉर्ज रुग्णालयात रक्ताचा तुटवडा
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काल रात्री दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्यात आतापर्यत 100 नागरिक ठार तर 300 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेंट जॉर्ट रुग्णालयात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. रक्ताअभावी जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना मोठी अडचण होत आहे.

जखमींची संख्या वाढण्याची शक्यता येथे वर्तवली जात आहे. शेकडो नागरिकांना वाचविण्यासाठी डॉक्टरांचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुंबईकरांनी रक्तदान करून जखमींना नवसंजीवनी द्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अधिकृत सुत्रांनी केले आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
दहशतवादी आले कुठून ?
नरीमन हाऊसमध्‍ये दहशतवाद्यांचा मुक्‍काम
कारवाईत सुमारे 800 जवानांचा सहभाग
दहशतवादी-अंडरवर्ल्‍ड यांचा संयुक्‍त हल्‍ला?
डेक्‍कन मुजाहिद्दीन व इंडियन मुजाहिद्दीन एकच
दहशतवाद्यांसाठी चांगले सरकार- सोळंकी