मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > विश्वास-अविश्वास
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'भारताने चीनसमोर जाणे डाव्यांना नापसंत'  Search similar articles
एएनआय
वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी अणुसहकार्य कराराचे समर्थन करताना काही लोकांना भारताने चीनसमोर जाणे पसंत नसल्याची टिपणी करून डाव्यांवर फटकेबाजी केली.

डाव्या पक्षाच्या सदस्याने त्यांना चीन व भारतात तुलना का करत आहात, असा प्रश्न विचारल्यानंतर संतप्त झालेल्या चिदंबरम यांनी हे वक्तव्य केले. काहींना चीनने आर्थिक महासत्ता झाल्याचे बघायचे आहे.

आपणास चीनच्या प्रगतीचे वैषम्य नाही मात्र चीनपेक्षा मागे पडणेही पसंत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताने आर्थिक सत्ता व आर्थिक महासत्ता बनावे, अशी‍ आपली इच्छा आहे.

भारताविषयी बोलताना भारताएवढाच विशाल व वैविध्य असलेल्या देशाविषयी बोलणे आवश्यक असून तो देश चीन आहे. भारतापेक्षा लहान किंवा गरीब देशांची आपण तुलना करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी
भाषण लिहायला राहुलला लागले पाच तास
विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी सीबीआयचा वापर
सरकार तरणे महत्‍वाचे नाही देशाची प्रतिष्‍ठा महत्‍वाची
राहूल गांधींच्या भाषणातून डोकावला विदर्भ
महागाई नियंत्रणात सरकार सपशेल अपयशी- मल्‍होत्रा
भाजपचे आजारी खासदारही दिल्लीत दाखल