मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > विश्वास-अविश्वास
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अमरसिंगांनी लाच दिल्याचा आरोप फेटाळला  Search similar articles
एएनआय
विश्वासमत ठरावादरम्यान तटस्थ राहण्यासाठी भाजपच्या तीन खासदारांना प्रत्येक एक कोटी दिल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंग यांनी फेटाळून लावला आहे. तीन दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने घराबाहेरही पडलो नाही.

या कालावधीदरम्यान पक्षाध्यक्ष मुलायम सिंगही हेही येथेच आहेत. घराबाहेर प्रसारमाध्यमांनी गराडा घातला असताना त्यांच्या डोळ्यात न येता खासदारांना पैसे देणे अशक्य कोटीतील गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावर त्यांनी संताप व्यक्त करताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भूतकाळात लाच देवाण-घेवाण केली असल्याने लालकृष्ण अडवाणींसहित भाजपा नेत्यांना आपल्याकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही. आरोपात तथ्य असल्यास ते पोलिसांकडे का गेले नाहीत.

कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी आपण तयार आहोत. आपण त्या खासदारांना पैसे दिल्याचे सिद्ध करून दाखवावे असेही आव्हानही त्यांनी दिले.
आणखी
सभागृहात गोंधळ सुरूच
विश्‍वासमतावर 7.50 वाजता मतदान
आजवरची सर्वांत खराब लोकसभा- चॅटर्जी
गोंधळ निर्माण करण्यात डाव्यांचा हातखंडा: लालू
'हाईड कायदा भारतावर बंधनकारक नाही'
तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी