जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आणि चीन च्या प्रमुख शहरांना एका झटक्यात उध्वस्त करून टाकण्याची क्षमता असलेल्या अग्नी या संपुर्णत: भारतीय बनावटीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे रशियन लष्कराने कौतुक केले आहे.
अग्नीची मारक क्षमता भारताने साडे तीन हजार किलोमीटर इतकी सांगितली असली, तरी हे क्षेपणास्त्र पाच हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकत असल्याचा दावा रशियाने केला आहे.
अग्नी तिनहे हे क्षेपणास्त्र रशियाच्या एस एस-20 चेच दुसरे रूप असल्याचे रशियन लष्कराचे म्हणणे आहे. रशियाचे मेजर जनरल येवबेगी बोरोदुनोव यांनी हा दावा केला आहे.
|