म्यानमारमध्ये आलेल्या नर्गिस या चक्री वादळातील मृतांचा आकडा दिवसें दिवस वाढतच असून, यात मृतांची संख्या एक लाखांवर असण्याची भिती अमेरिकेने व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात म्यानमार मध्ये नर्गिस या चक्रीवादळाने तांडव घातले होते. वादळामुळे राजधानी यांगूनमधील अनेक घरांना तडे गेले आहेत.
यात सुमारे 15 हजार जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला सरकारने दुजोरा दिला असला तरी आता म्यानमारमध्ये मदत घेऊन पोहचणार्या देशांच्या प्रतिनिधींना येथील भयावह परिस्थितीचा अंदाज येत आहे.
म्यानमार भेटीवर असलेले अमेरिकी राजकीय आधीकारी नॅरी विलासोरा यांनी म्यानमारमृतांची संख्या एक लाखांवर असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
|