भारताने अग्नी तीनची यशस्वी चाचणी करून चोवीस तास लोटत नाहीत तोच पाकने जमिनीवरून तसेच समुद्रात 350 किलोमीटरवर मारा करणार्या आपल्या हत्फ-8 या क्षेपणास्त्राची काल चाचणी घेतली. पाक सैन्याने दिलेल्या माहितीनुसार हत्फने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राचे काल यशस्वी परीक्षण केले.
राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ आणि पंतप्रधान युसुफ गिलानी यांनी परीक्षणानंतर पाक वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. यापूर्वी हत्फचे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात प्रथम परीक्षण करण्यात आले होते.
|