मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'ब्ल्यू टूथ' वापरताय? सावधान
एएनआय
हल्ली मोबाईल फोनमध्ये 'ब्ल्यू टूथ'ची सुविधा असणे यात काही नवीन नाही. 'ब्ल्यू टूथ'च्या माध्ममातून दुसर्‍या फोनमधून, संगणकामधून काहीही डाऊनलोड केले तरी आपल्याला कोणी पाहू शकणार नाही, असे वाटत असेल तर तुमची ही समजूत तत्काळ दूर करा. या 'वायरलेस नेटवर्क'च्या माध्यमातून तुम्ही 'जोडले' गेलेले असल्याने तुमच्या प्रत्येक हालचालींची नोंद असते. त्याद्वारे तुम्हाला कसेही शोधता येणे शक्य आहे.

एखाद्याजवळ पीसी आणि त्याचा योग्य असा रिसिव्हर असल्यास त्या पीसीतील माहिती कोणी काढली हे शोधणे शक्य असल्याचे इंग्लंडमधील बाथ विद्यापीठातील व्हॅसिलिस कोस्टोक्स यांनी सांगितले. त्यासाठी कोस्टोक्स व त्यांच्या सहकार्‍यांनी एक प्रयोग केला. 'ब्ल्यू टूथ' रिसिव्हर शहराच्या मध्यभागी लावून ठेवला. त्याद्वारे चार महिन्यांत त्यांच्या टिमने दहा हजार 'ब्ल्यू टूथ' फोन शोधून काढले. या सगळ्या मंडळींनी पबमध्ये, रस्त्यावर, दुकानात 'ब्ल्यू टूथ'च्या माध्यमातून काय पराक्रम केले हेही काढणे या टिमला शक्य झाले.

पण तरीही कोस्टोक्स यांच्या मते 'ब्ल्यू टूथ' हा खाजगीपणाला नख लावणारा प्रकार आहे. आपल्याकडची कोणतीही माहिती कुणी चोरू नये असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या फोनमधील 'ब्ल्यू टूथ' ची यंत्रणा बंद करून ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
आणखी
उदारमतवाद्यांपेक्षा परंपरावादी लोक आनंदी
पाकने केली हत्फ-8 ची चाचणी
हिलेरींवर 64 लाख डॉलरचे कर्ज
नर्गिस वादळात मृतांची संख्या लाखांवर?
अग्नीला तोड नाही- रशिया
पाकचे नाजूक परिस्थितीतून मार्गक्रमण