अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांची मुलगी जेना हिचे शनिवारी शुभमंगल होत आहे. यासाठी टेक्सासमधील एका फार्म हाउसवर जोरदार तयारी सुरू असून या विवाह सोहळ्याचे चित्रीकरण अथवा वार्तांकन करण्यास प्रसार माध्यमांना बंदी घालण्यात आली आहे.
हा बुश परिवाराचा खाजगी कार्यक्रम असून, सरकार विवाहा नंतर लगेच छायाचित्र प्रकाशित करणार असल्याची माहिती व्हाईट हाउसचे प्रवक्ते गार्डन जानडोर यांनी दिली.
|