व्यवस्थापन क्षेत्रात सध्या महिला नव्या क्षितिजाकडे वाटचाल करत आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की महिला या पुरुषांपेक्षा उत्कृष्ट व्यवस्थापन करू शकतात. त्या उत्कृष्ट व्यवस्थापक असतात.
व्यवस्थापनात येणार्या समस्या सोडवण्यातही महिला आघाडीवर असतात असे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. यासाठी सुमारे १८०० महिला व्यवस्थापकांच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले.
यात त्या कंपनीचा एखादा मुद्दा ग्राहकाला पटवून देणे, कंपनीच्या व्यवस्थापनात निर्माण होणारे अडखळे आणि प्रसंगी भावनिक होत त्या या सर्व समस्यांवर मार्ग काढत असल्याचे दिसून आले आहे.
याउलट पुरुष व्यवस्थापक केवळ व्यवस्थापनातील आर्थिक व्यवहारावर नियंत्रण आणि त्याचे नियोजन करणे या दोनच भूमिका उत्तम बजावू शकतात असे आढळून आले आहे.
|