अमेरिकेतील हिंदू संघटनांनी फेडरल कम्युनिकेशन कमिशनला हस्तक्षेप करण्याचे आवाहन करताना विनोदी हॉलिवूड चित्रपट 'द लव्ह गुरू'च्या प्रदर्शनास मनाई करण्याची मागणी केली आहे.
गुरू-शिष्य संबंधाची खिल्ली उडवण्यात येऊन चित्रपटाने हिंदू समुदायाच्या भावना दुखावण्यात आल्याचे हिंदू जनजागृती समितीने सरकाराला कळवले आहे. गुरू-शिष्य परंपरेबाबत चुकीची माहिती पसरवण्यासोबतच धार्मिक व आध्यात्मिक भावनांचा अनादर थांबवण्यात यावा, असे आवाहन समितीच्या भावना शिंदे यांनी केले आहे.
वितरक, चित्रपटगृहांना पॅरामाऊंट पिक्चर्सने आवश्यक फेरबदल केल्याशिवाय वितरण थांबवण्यासोबतच चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचे आवाहन समितीने केले होते. माइक मायर्स, जेसिका अल्बा, जस्टीन टिंबरलेक व बेन किंग्सले यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट 20 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
|