मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सुदृढ हृदयाचे रहस्य अश्मयुगीय आहारात
भाषा
सुदृढ हृदय हवे असल्यास अश्मयुगीय मानवासारखा आहार घ्यायला सुरूवात करा. जंगलतील फळे, बोर, शेंगदाने, फॅट्स नसलेले मास व मासे यासारख्या आहारामुळे हृदयरोग जडण्याची शक्यता खूप कमी असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

स्विडनमधील कारोलिन्सका इन्स्टिट्युटच्या शास्त्रज्ञांना फक्त तीन आठवड्यांसाठी अश्मयुगीन आहाराचे पालन केलेल्या व्यक्तींचा रक्तदाब कमी होण्यासोबतच हृदयाचा धमन्यांना रक्पपुरवठा करण्यास अडथळा निर्माण करणार्‍या घटकाचे प्रमाणही घटल्याचे आढळून आले आहे.

यासोबतच त्यांचे अतिरिक्त दोन ते तीन किलो वजनही कमी झाले आहे. याबाबत संशोधक पथकाचे नेतृत्व करत असलेले डॉ. पेर वांडेल यांनी वक्तव्य 'द डेली टेलिग्राफ' मध्ये प्रकाशित झाले आहे. अन्नधान्य, डेअरी उत्पादने, रिफाइंड साखर या घटकांच्या सेवनाशिवाय म्हणजेच शेतीचा शोध लागल्याअगोदरपासून आपले पूर्वज याच डायटवर जगले आहेत.

मानवी इतिहासाचा तो एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. संशोधनासाठी सुमारे वीस स्वयंसेवकांना बोर, ताजे व साठवलेले फळे, भाजीपाला, फॅट्स नसलेले मास, मासे, लिंबूचा रस यासारख्या आहारावर तीन आठवडे ठेवण्यात आले होते.
आणखी
पाकमध्ये अमेरिकी विरोधी वारे
'व्हिडिओ गेम्स' मुलांना बिघडवत नाहीत
येहूद ऑल्मर्ट यांचे लाच घेतल्याचे खंडन
हिंदूंची 'लव्ह गुरू'वर बंदीची मागणी
पुरुषांपेक्षा महिलाच उत्तम 'व्यवस्थापक'
दिलीप छाब्रीयांना 'सिल्व्हर प्लॅटर' सन्मान