नेपाळमध्ये राजेशाही संपृष्टात आणण्यासाठी मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात घटना समितीची बैठक घेण्याबाबत सर्वसंमती झाल्यानंतर सरकार स्थापण्यासाठी माओवादी व प्रमुख राजकीय पक्षांनी चर्चेस सुरूवात केली आहे.
माजी बंडखोरांच्या नेतृत्वाखालीली आघाडीस पाठिंबा द्यायच्या मुद्दयावर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये विचारमंथनास सुरूवात झाली असताना माजी पंतप्रधान गिरीजाप्रसाद कोईराला, माओवादी नेते प्रचंड व इतर पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सरकार स्थापण्यासाठी चर्चेची फेरी पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी माओवादी व इतर पक्षांचे कार्यकाही पथक स्थापण्यात आले आहे. नेपाळी कॉंग्रेसचे नेते कोईराला यांच्या निवासस्थानी बैठख घेण्यात आली. यामध्ये घटनेचे स्वरूप ठरवण्यासाठी सदस्यांची बैठक 25 ते 29 मे दरम्यान बोलावण्यावर सहमती झाली. मोओवाद्यांना घटना समितीच्या निवडणुकीत 601 पैकी 220 जागा मिळाल्या असून त्यांच्या सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
|