आपल्याला मध खायचा असतो तेव्हा आपण मधाच्या बाटलीत हात घालत नाही, कारण ते मध आपल्या हाताला चिकटण्याची अधिक शक्यता असते, आपल्याला तशी भितीच असते.
आपण मधाच्या बाटलीत जेव्हा चमचा घालतो, तेव्हा त्यालाही बरेचसे मध चिकटलेले असते. याचे कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. आणि जर मग यात वैज्ञानिक जर एकत्र आले, तर त्यांच्यात या विषयावरून गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद आहेत.
अनेकांनी या विषयी अनेक तर्क लढवले आहेत. परंतु आता याचे नेमके कारण शोधण्यास ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांना यश मिळाले असून, मधात साखरेचे अत्यंत सुक्ष्मकण असल्याने आपण जेव्हा मधाच्या डब्यात चमचा घालतो तेव्हा ते हे साखरेचे कण ज्या प्रमाणे ट्रॅफिक जॅम झाल्यावर गाडी हळू हळू पुढे सरकते अगदी याच तंत्राने पुढे सरकतात आणि आपल्याला असा आभास होतो की चमच्याला मध चिकटला आहे.
मधच काय तर ज्या पदार्थात साखरेचा अंश आहे, त्या सर्वच पदार्थांचे चिकटण्याचे कारण हेच असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
मेलबॉर्नच्या मोन्हास विद्यापीठातील डॉक्टर लॅन लार्सन यांनी या विषयी बोलताना स्पष्ट केले, की साखरेतले हे सुक्ष्मकण जेव्हा पाण्यात मिसळण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा चिकटपणा वाढतो.
|