नेपाळमधील निवडणुकांनंतरही माओवाद्यांनी हिंसक कारवाया सुरूच ठेवल्याचा आरोप करत माओवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी नेपाळ कॉग्रेसने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून माओवादी कार्यकर्त्यांनी नेपाळ कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ले सुरूच ठेवले असल्याचे कॉग्रेसचे म्हणणे आहे.
या कार्यकर्त्यांना सरकारने संरक्षण तर द्यावेच पण त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पक्षाचे सरचिटणीस शुभंकर प्राजले यांनी सरकारकडे केली आहे.
|