कशाला कोणता छंद जडेल याचा काही नेम नाही. याला छंद म्हणा किंवा वेडेपणा, पण प्रसिद्ध फोटोग्राफर स्पेंसर ट्यूनिक यांनी काल ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे 600 लोकांचे अगदी नैसर्गिक अवस्थेत फोटो काढले. विशेष म्हणजे लोकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या फोटेसेशनमध्ये सहभाग घेतला.
सर्वांत आधी ट्यूनिक यांनी या सर्वांना एका विशाल मैदानावर एकत्र बसवले आणि त्यांचा एक ग्रुप फोटो काढला.यानंतर मैदान व्यवस्थापनाने त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी काही जणांचे वैयक्तिक फोटो काढले.
या सर्वांना 2008मध्ये याच मैदानावर होणार्या फुटबॉल फायनलची तिकिटं देण्यात येणार असून त्यांना त्यांच्या फोटोच्या प्रतीही देण्यात येणार आहेत. यापूर्वी ट्यूनिक यांनी 1800 जणांचे निर्वस्त्र अवस्थेतील फोटो काढले आहेत.
|