पाकमधील गिलानी सरकारने सत्तेचा अजून पुरते तीन महिनेही उपभोग घेतला नसतानाच नवाज शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीतील न्यायाधीशांच्या पुर्नबहालीवरून मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
यावर अंतीम निर्णय न घेतल्यास पीपीपी सरकारचा पाठींबाच काढून घेण्याची तयारी शरीफ पक्षाने सूरू केली आहे. आज या संदर्भात शरीफ यांच्या पक्षाची लाहोरमध्ये बैठक असून यात या विषयाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आल्याचे समजते.
आज शरीफ आपला लंडन दौरा उरकून पाकमध्ये येत आहेत, यानंतर ते पक्षातील काही वरिष्ठ सदस्यांशी या विषयावर चर्चा करणार असून, यानंतर संसदीय समितीच्या बैठकीत या विषयी ते इतर सदस्यांचे मत जाणून घेणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोनही पक्षांमध्ये न्यायाधीशांच्या पुर्नबहालीवरून मतभेद निर्माण झाले आहेत.
|