मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पक्षाचे मंत्री मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार:नवाझ
एएनआय
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आणीबाणीच्या काळात बडतर्फ करण्यात आलेल्या न्यायमूर्तींची परत पुनर्बहाली करण्याची मुदत संपल्यानंतरही वादावर तोडगा न निघाल्याने आपल्या पक्षाचे केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री राजीनामा देईल, असा इशारा दिला आहे.

पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांना मंगळवारी राजीनामे सादर करण्यात येईल, असे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या मुद्यावर पाकिस्तान पीपल्स पक्षासोबत सहमती न झाल्याने नवनियुक्त सरकार राजकीय अस्थैर्याच्या चक्रात सापडले आहे.दोन्ही पक्षांनी मुरी व भुरबन येथे स्वतंत्र जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करून न्यायमूर्तींना पदबहाली करण्याची इच्छा व्यक्त केली होती, हे उल्लेखनीय.

शरीफ यांनी न्यायमूर्तीच्या पुनर्बहालीसाठी पीपीपी पक्षास बारा मे पर्यंतची मुदत दिली होती. उद्या (मंगळवारी) आपल्या पक्षाचे मंत्री पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांनी राजीनामे सोपवतील. मात्र सरकार अस्थिर करण्याच्या कोणत्याही कारस्थानाचा भाग बनणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र गिलानी सरकारला बाहेरून पाठिंबा कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट करण्यात आले आहे.
आणखी
चीनला भूकंपाचा झटका
पाकमधील गिलानी सरकारवर संकट
संसाराची दोरी 'स्त्री'च्याच हातात
विवस्त्र फोटोसेशनला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमेरिकेतील वादळात 22 ठार
सरकार कार्यकाळ पूर्ण करेल: गिलानी