ब्रिटनने अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरूद्धच्या लढाईत ब्रिटिश मुस्लिमांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टिने लष्करभर्तीत त्यांना सामावून घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.
स्थलसेनेचे कमांडर इन चीफ सर डेव्हिड रिचर्डस यांनी संरक्षण साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीती ही माहिती उघड केली. लष्करात मुस्लिमांचा समावेश केल्यास लष्कर दहशतवादाविरूद्धच्या लढाईत अधिक सक्षम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
|