पुढील वर्षी अमेरिकेवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. 2009मध्ये पुन्हा एकदा दहशतवादी अमेरिकेला आपले लक्ष करू शकतात असी शक्यता सीनेटर जोई लिबरमेन यांनी व्यक्त केली होती, यानंतर आज व्हाईट हाउसने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
व्हाईट हाउसने याची अधिकृत घोषणा केली नसली, तरी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र हे खरे असल्याचे म्हटले आहे. काही दहशतवादी अजूनही अमेरिके विरोधात घातक कट रचत असून, त्यांच्या या मनसुब्यांवर पाणी फेरण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केल्याचे मत व्हाईट हाउस प्रवक्त्या डाना पेरिनो यांनी व्यक्त केले आहे.
|