अणुकरारावर डावे सरकारच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून असताना पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांची यासंबंधात भेट घेणार आहेत.
यासोबतच अणुपुरवठा संघातील (एनएसजी) प्रमुख सदस्यांची भेट घेऊन अमेरिकेसोबतच्या नागरी अणुकरारासाठी त्यांना सहकार्याचे आवाहन करणार आहे.
अमेरिकेसोबतच्या अणुकरार प्रक्रियेस जुलै 2005 मध्ये सुरूवात झाल्यापासून डाव्यांनी कट्टर विरोध करून सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान येथून दोनशे किलोमीटर अंतरावरील टोया येथे बुश यांची भेट घेतील.
जी-8 देशांचे नेतेही येथेच थांबलेले आहेत. भरतासंबंधित सुरक्षा करारासाठी आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संघटकडे (आयएईए) जाण्याशिवाय एनएसजीकडे जाण्याबाबतही बुश यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांनी भारताने निर्णय घेतल्यानंतर अमेरिका वचनबद्ध असल्याकडे लक्ष वेधले. याशिवाय आयएइएकडे लवकरच जाणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी मान्यता दिल्यास प्रक्रिया झपाट्याने पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली.
|