मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
तिबेटप्रश्नी ओबामांचा ऑलिम्पिकवर बहिष्कार?  Search similar articles
भाषा
अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या बीजिंग ऑलिम्पिक शुभारंभ सभारंभास उपस्थित राहण्याचा निर्णयानंतर डेमॉक्रॅटीक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा यांनी चीनची तिबेटप्रश्नी भूमिका लक्षात घेऊनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

शुभारंभ समारंभास उपस्थित राहण्याबाबतचा निर्णय घेण्याअगोदर चीन सरकारकडून तिबेटप्रश्नी ठोस प्रगती बघायची आहे. अन्यथा आपण बहिष्कार घालणार असे त्यांनी स्पष्ट केले.

चीन सरकारच्या दलाई लामा यांच्यासोबतच्या चर्चा प्रक्रियेदरम्यान चीन सरकारवर दबाव बनवण्यात बुश सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. बुश यांनी मागील आठवड्यात

शुभारंभास उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. तिबेटप्रश्न हाताळणी व चीनचे मानवी हक्काबाबतच्या रेकॉर्डवर बोट ठेवून जगभरातील काही नेत्यांनी ऑलिम्पिक सोहळ्यावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.

दलाई लामांच्या प्रतिनिधींनी चीन ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरला असून फक्त जागतिक दबाव कमी करण्यासाठी ते चर्चेची तयारी दाखवत असल्याचा आरोप केला होता.
आणखी
खलिदा झियांची सुटका शक्य: फक्रुद्दीन अहमद
पंतप्रधान अणुकरारासंबंधात बुश यांना भेटणार
तस्लिमांना पॅरिसचे नागरिकत्व
अमेरिकी निवडणुकीत अर्थव्यवस्था मुख्य मुद्दा
भारतीयाच्या मृत्यू प्रकरणी अमेरिकी महिलेला शिक्षा
भारतीय दूतावासावरील हल्ल्यात 41 ठार