मॉरिशसमध्ये प्रथमच ऑगस्ट महिन्यात 24 वे आंतरराष्ट्रीय रामायण संमेलन भरवण्यात येणार असून, त्याचे उद्घाटन मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीन रामगुलाल करणार असल्याची माहिती संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन प्रसाद व्यास यांनी दिली.
9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या संमेलनाची तयारी पूर्णं करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. संमेलनासाठी मॉरिशसच्या संसदेत एक प्रस्तावही मंजूर करण्यात आल्याची माहिती व्यास यांनी दिली. संमेलन यशस्वी करण्यासाठी विश्व साहित्य संस्कृती संस्थेची मदत घेण्यात येणार असून, या संमेलनात अनेक मंत्रीही सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
|