काही दिवसांपूर्वी पाक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करत मुशर्रफ यांच्या हत्येचा डाव उधळून लावला होता, आता याचीच पुनरावृत्ती घडली आहे.
लाल मशीदचे मौलाना अब्दुल अजीज यांच्या पत्नीने मुशर्रफ यांची हत्या करण्यासाठी सुरू केलेल्या एका प्रशिक्षण स्थळावर छापा टाकत पुन्हा एकदा मुशर्रफ यांच्यावर हल्ला करण्याचा डाव उधळून लावला आहे. पोलिस महानिरिक्षक शौकत जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार उम्मे हसन या महिलेने हा कट रचला होता. दरम्यान पोलिसांनी केलेले सर्व आरोप हे खोटे असल्याचे हसन यांनी स्पष्ट केले आहे. आपण कायम दहशतवादाला विरोध केल्याचेही त्या म्हणाल्या.
|