मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सार्कोझींना दलाई लामांना न भेटण्याचा इशारा  Search similar articles
एएनआय
ऑलिंपिक शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करणाऱ्या फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षांना चीनने तिबेटच्या अध्यात्मिक नेते दलाई लामा यांची फ्रांसमध्ये भेट न घेण्याचा इशारा दिला आहे.

फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी दलाई लामांना भेटल्यास उभय देशातील द्विपक्षीय संबंधावर परिणाम होईल. हे पाऊल इतर देशांच्या आंतरराष्ट्रीय संबंधात हस्तक्षेप न करण्याच्या धोरणाविरूद्ध ठरेल, असा इशारा फ्रांसमधील चीनचे राजदूत कॉंग कॉन यांनी दिला आहे.

मात्र सार्कोझी यांनी ते दलाई लामांची भेट घेतील किंवा नाही हे स्पष्ट केलेले नाही. चीनच्या मते दलाई लामा हे फुटुरवादी असून त्यांनी चीनच्या सार्वभौमत्वास इजा पोहचवण्याचे प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप आहे.
आणखी
पाकच्या नेत्यांची दुबईत बैठक
पाकच्या शेरी रेहमान दहशतवाद्यांच्या लक्षावर
ऑस्ट्रेलियाकडून अणुकरारास समर्थनाचे संकेत
इस्लामाबादमध्ये घुसले आत्मघाती पथक
अटक करण्यात आलेल्या भारतीयांवर सक्ती नको
पाकिस्तान इंधनसमस्येच्या उंबरठ्यावर