मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गिलानींची अनिर्धारित दुबई भेट एक कोटीची  Search similar articles
एएनआय
पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी जी-8 परिषदेस उपस्थिती दर्शवल्यानंतर क्वालालंमपूर येथून इस्लामाबादला उतरण्याऐवजी थेट दुबई गाठल्याने सरकारच्या तिजोरीवर एक कोटीचा अतिरिक्त बोजा पडला आहे.

गिलानी त्याच्या चाळीस सदस्यीय प्रतिनिधीमंडळासोबत परिषदेस उपस्थित राहिले होते. पन्नासहून अधिक सुरक्षा अधिकारी व प्रशासनिक अधिकारी अगोदरच क्वालालंमपूर येथे दाखल झाले होते.

प्रतिनिधीमंडळास इस्लामाबाद येथे परतायचे होते. मात्र, गिलानी यांना दुबईत पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या नेत्यांशी अचानक बैठकीस उपस्थित राहण्यासाठी विमान संयुक्त अरब अमिरातीकडे वळवण्यात आले.

यामुळे तिजोरीवर सोळा लाखाचा अतिरिक्त बोजा पडला. याशिवाय प्रवासाचा हंगाम असल्याने विमानाच्या अतिरिक्त वापरामुळे आणखी पन्नास लाखाचा भुर्दंड पडला.

दुबईत पोहचल्यानंतर काही प्रशासनिक अधिकारी व प्रतिनिधी मंडळातील काही सदस्यांची 'ग्रँड हयात हॉटेल'या जगातील सर्वाधिक महागड्या हॉटेलपैकी एका ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. बाकीच्यांना 'मुह- इन-पीक' येथे थांबवण्यात आले.
आणखी
तालिबान बंडखोरांचा नाटोच्या तळावर हल्ला
नेपाळमध्ये माओवादी व यूएमएल चर्चा फिसकटली
पाकमध्ये सत्ताधारी आघाडीचे विचारमंथन
हॉंगकॉंग विमानतळ जगभरातून सवौत्कृष्ठ
खान पाकसाठी इतिहास, अमेरिकेसाठी वर्तमान
काबुलमध्ये भारत आयटीबीपीचा पहारा वाढवणार