राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत वर्णभेदी विभागणी ठळक झाली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत येथे डेमॉक्रॅटस बराक ओबामा यांच्या रूपात पहिल्यांदाच आफ्रिकन-अमेरिकन उमेदवार रिंगणात आहे.
डेमॉक्रॅटस उमेदवार ओबामा यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅकेन यांच्या तुलनेत आघाडी घेऊन अमेरिकेनेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनून इतिहास रचण्याची तयारी चालवली आहे.
मात्र न्यूयॉर्क टाईम्स व सीबीएस न्यूज पोलच्या सर्वेक्षणातून अमेरिकेतील मतदार वर्णभेदाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात विभागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ओबामास 89 टक्के कृष्णवर्णीय मतदारांनी समर्थन व्यक्त केले आहे.
मात्र मॅकेन यांना फक्त दोन टक्के कृष्णवर्गीयांनी समर्थन दर्शवले आहे. श्वेतवर्णीयात ओबामांना समर्थकांचे प्रमाण 37 टक्के तर मॅकेन यांना 46 टक्के श्वेतवर्णीयांचे समर्थन लाभले आहे.
साठ टक्के मतदारांनी वांशी भेदभाव वाईट असल्याचे म्हटले आहे तर फक्त 34 टक्के श्वेतवर्णीयांना असे वाटते. एकंदरीत कृष्ण व श्वेत दोन्ही वंशाचे लोक कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष निवडण्यास तयार आहेत. मात्र, सर्वेक्षणात यासंबंधीच्या प्रश्नावर त्यांच्या मतभिन्नता आहे.
|