बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा महिन्यावर येऊन ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने राजधानीसभोवताली तिहेरी संरक्षण कवच उभारले आहे. शहरात प्रवेश करणारे व्यक्ती व वाहनांवर कडी नजर ठेवण्यात येत आहे.
दहशतवाद्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवरही एवढ्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. द्रुतगती महागार्ग, राष्ट्रीय महामार्ग, शहर व गावातील रस्त्यावर शकडो चेक पोस्ट तैनात करण्यात आले आहे.
राजधानीकडे जाणारे सर्वच मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. सुरक्षा चौकशीमुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी चेक पोस्टवरील व्यक्तींच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेच्या सुभारंभ सोहळ्यास जगभरातील नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
|