सत्ताधारी पीपीपी पक्षाचे असिफ अली झरदारी यांना न्यायमूर्तीच्या पुनर्नियुक्तीची वचनपूर्ती करण्यास सांगताना नवाझ शरीफ यांनी याप्रश्नी तोडग्यासाठी व राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफांना कृत्यासाठी जबाबदार ठरवण्यासाठी झरदारींशी शेवटची चर्चा करू, असे स्पष्ट केले.
मात्र झरदारींसोबतच्या प्रस्तावित भेटीतून काही निष्पन्न न झाल्यास पीएमएल-एन कोणती पावले उचलणार, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. लंडनमध्ये पक्षसमर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी हे स्पष्ट केले.
आणीबाणीच्या काळात राष्ट्राध्यक्ष मुशर्रफांनी बडतर्फ केलेल्या साठ न्यायमूर्तीची पुनर्नियुक्ती करण्यात ते अपयशी ठरल्यानंतर शरीफ यांच्या पक्षाचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते. शरीफ यांनी दोन पक्षातील आघाडी भक्कम राहावी, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
झरदारी यांनी याबाबत वचन दिल्याने ते धोरणाचा पाठपुरावा करतील. आता अंतिम चर्चेची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच पक्षास लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप थांबवायचा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
|