गझलसम्राट मेहंदी हसन यांना पाकिस्तान सरकार आयुष्यभरासाठी महिन्याकाठी पन्नास हजार रुपयांचे साहाय्य देणार आहे. हसन (81 वर्ष) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतल्यावर त्यांच्या सन्मानार्थ ही घोषणा केली. हसन यांनी देशाच्या सांस्कृतिक वारस्यात महान भर टाकली आहे.
हसन यांच्या दोन नातवांना नोकरी देण्यासोबतच मुलगा साजिद मेहंदी यांना बढती देण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. मेहंदी हसन यांनी पाकिस्तानच्या ख्यातीत भर घातली असून देशास त्यांचा अभिमान असल्याचे स्पष्ट केले.
हसन यांचा जन्म 1927 साली राजस्थानातील लुना गावात पारंपरिक संगीतकारांच्या कुटुंबात झाला होता. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानात गेले होते.
|