मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाकच्या संरक्षण निर्यातीत तिप्पट वृद्धी  Search similar articles
भाषा
दक्षिण आशिया, मध्यपूर्व व आफ्रिकन देशांना शस्त्रास्त्रे व दारूगोळा विक्रीत वृद्धी झाल्याने पाकिस्तानची संरक्षण निर्यात तब्बल तिप्पट वाढून 300 मिलियन अमेरिकन डॉलरवर पोहचली आहे.

दारूगोळा, रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, रॉकेट लॉंचर व जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा निर्यातीत समावेश आहे. पाककडून निर्मिती दारूगोळा व शस्त्रास्त्रे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने निर्यातीत वृद्धी होत असल्याचे मेजर जनरल मोहम्मद फारूक यांनी स्पष्ट केले.

फारूक हे संरक्षण निर्यात प्रसार परिषदेचे संचालक आहेत. विकसित देशांशी स्पर्धा करून बोईंग विमानाचे सुटे भाग बनवण्याचा कॉंट्रॅक्टही आम्ही पटकावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संरक्षण निर्यातीच्या आकड्याने तिप्पट वृद्धी केल्याने हे देशासाठी चांगले लक्षण आहे. हा व्यवसाय क्लिष्ट असून सरकार ते सरकार दरम्यान हा व्यवहार होत असतो. शस्त्रास्त्रे चुकीच्या हातात पडू नयेत यासाठी देश जागतिक समुदायास जबाबदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी
पाकिस्तानी कवी अहमद फराझ यांचे निधन
चीनचे आयएईत अणुकरारास समर्थनाचे संकेत
गिलानींचा मेहंदी हसन यांना मदतीचा हात
नेपाळमध्ये राष्ट्रपतिपदासाठी निवडणुक अटळ
शरीफ करणार झरदारींशी अंतिम चर्चा
ऑलिम्पिकसाठी बीजिंगभोवती सुरक्षेचा वेढा