मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
देशाचे चुकीच्या दिशेने मार्गक्रमण: पाकिस्तानी  Search similar articles
नवाझ शरीफ सर्वाधिक लोकप्रिय नेते
भाषा
पाकिस्तानची वाट भरकटल्याचे देशातील बहुतांश जनतेस वाटत आहे. यासोबतच न्यायमूर्तीच्या पुनर्नियुक्तीवरून सत्ताधारी आघाडी सरकारमधून बाहेर पडणारे नवाझ शरीफ हे सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून उदयास येत आहे.

नुकत्याच घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. देशाचे मार्गक्रमण चुकीचे वाटेने सुरू असल्याचे मत तब्बल 86 टक्के जनतेने व्यक्त केले आहे. यासोबतच राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर महाभियोग चालवावा, असे मत 83 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे.

मुशर्रफांच्या लोकप्रियतेस ओहोटी लागली असून बेनझीर भुत्तोंच्या हत्येनंतर शरीफ सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले आहेत. देशातील तब्बल 82 टक्के लोकांनी त्यांना पसंत दर्शवली असून फक्त 6 टक्के लोकांनीच त्यांच्याविरूद्ध मत व्यक्त केले आहे.

याअगोदर जून 2006 मध्ये मुशर्रफ व भुत्तोंनंतर ते 36 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर होते. अमेरिकेतील इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूटने हे सर्वेक्षण केले आहे. पाकिस्तानातील चार प्रांतातील 223 ग्रामीण व 127 नागरी भागातून सुमारे 3,484 पुरूष व स्त्रियांचा रँडम नमुना सर्वेक्षणासाठी निवडण्यात आला होता.
आणखी
पाकच्या संरक्षण निर्यातीत तिप्पट वृद्धी
पाकिस्तानी कवी अहमद फराझ यांचे निधन
चीनचे आयएईत अणुकरारास समर्थनाचे संकेत
गिलानींचा मेहंदी हसन यांना मदतीचा हात
नेपाळमध्ये राष्ट्रपतिपदासाठी निवडणुक अटळ
शरीफ करणार झरदारींशी अंतिम चर्चा