नेपाळमध्ये सरकारस्थापन्याच्या दिशेने पाऊल पडले असून प्रजासत्ताकाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष्याच्या निवडणुकीसाठी संविधान सभेचे सदस्य उद्या (शनिवारी) मतदान करतील. घटनात्म प्रमुख म्हणून राष्ट्रपती यानंतर पंतप्रधानास शपथ देतील.
राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदासाठीचा निवडणुक प्रचार आज सायंकाळी आटोपला. उमेदवारांनी खासदारांच्या समर्थनासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन भेटीही घेतल्या. तिन्ही प्रमुख पक्षांनी मधेशी उमेदवारांना रिंगणात उतरवल्याने राष्ट्रपती भारतीय वंशाचा राहील हे निश्चित आहे.
मधेशींचे भारताच्या सीमेगलतच्या दक्षिण तेराई भागात वास्तव्य आहे. निवडणुकीसाठी संविधान सभेचे 594 सदस्य पात्र आहेत. माओवाद्यांचे नवा जणवादी मोर्चाचे उमेदवार रामराजा प्रसाद सिंग यांना तीनही मधेशी पक्षांचे समर्थन असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
सिंग यांनी दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून नरेशाविरोधी निदर्शनात त्यांनी संसदेवर छोटा बॉम्बं फेकल्याप्रकरणी त्यांनी 1985 मध्ये अटक झाली होती.
नेपाळी कॉंग्रेस व कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाने राम बरन यादव व रामप्रित पासवान यांनी रिंगणात उतरवले आहे. माओवाद्यांचे 226 सदस्य असून मधेशींच्या 86 सदस्यांच्या समर्थनानंतर त्यांची मते 314 पर्यंत पोहचणार असल्याचे सिंग यांचा विजय निश्चित आहे.
|