मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ब्रिटन इराकमधून लष्कर मागे घेणार  Search similar articles
भाषा
ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी वर्षाअखेरपदर्यंत इराकमधून ब्रिटिश लष्कर मागे घेण्याचे संकेत दिले आहे. युद्धसदृश्य परिस्थिती असलेल्या इराकमधील परिस्थिती सुधारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सद्या ब्रिटिश लष्कराचे मुख्यालय असलेले बसरा विमानतळ लवकरच इराकी लष्करास सोपवण्यात येईल. ब्रिटनचे लष्कर निर्धारित वेळेत मागे घेता यावे यासाठी इराकी लष्करास प्रशिक्षिण देण्यात येणार आहे.

इराकमधील मोहिमेचा शेवटचा टप्पा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ऑक्टोबरमध्ये त्यांनी इराकमध्ये अडीच हजार सैन्याची कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र बसरा येथे अजूनही चार हजाराहून अधिक जवान तैनात आहेत. ब्राऊन हे एकदिवसाच्या इराकभेटीवर होते. 'द ऑब्झरर्व्हर' मध्ये प्रकाशित झालेल्या वृ्त्तानुसार लष्कर मागे घेण्यासाठी वास्तव धोरण अवलंबण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. इराक व अमेरिकेत लष्कराच्या कपातीबाबत सहमती झाल्याचे जाहीर केल्यानंतर ब्राऊन यांचे वक्तव्य आले आहे.
आणखी
नेपाळच्या उपराष्ट्रपतिपदी परमानंद झा
परारष्ट्र सचिव‍ांची आयएईए अध्यक्षांशी भेट
नेपाळचा राष्ट्रपती राहणार भारतीय वंशाचाच
देशाचे चुकीच्या दिशेने मार्गक्रमण: पाकिस्तानी
पाकच्या संरक्षण निर्यातीत तिप्पट वृद्धी
पाकिस्तानी कवी अहमद फराझ यांचे निधन