पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी दहशतवादाविरूद्धची लढाई पाकची चिंता असून परराष्ट्राच्या सेना देशात घुसू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दहशतवादाचे आम्ही स्वतःच बळी असून तो निपटून काढण्यात कसलीही कसूर करण्यात येणार नसल्याचे जागतिक सत्तांना स्पष्ट करताना देशाच्या सार्वभौमत्वाच्या प्रश्नावर तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी राष्ट्रास केलेल्या संबोधनात स्पष्ट केले.
देशाच्या भूमीवर परकीय शक्तींना उतरू देणार नाही, असे त्यांचे वक्तव्य 'डेली टाइम्स' मध्ये प्रकाशित झाले आहे. देशास समस्येतून बाहेर काढण्यासोबतच सद्याची अस्थिरता संपवण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले.
|