पुढील महिन्यापासून सुरू होणार्या ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत करून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी बीजिंगमध्ये बंद अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात चीनमधील निम्म्याहून अधिक वाहनांची वाहतूक ठप्प करण्यात येणार आहे. हे अभियान दोन महिन्यासाठी असून त्यानुसार सम आणि विषम नंबर प्लेटचे वाहने दिवसाआड चालविले जाणार आहेत.
प्रदूषण परसरविणार्या अनेक औद्योगिक कंपन्यांनाही अस्थायी स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. सरकारद्वारे चालविण्यात येणार्या उद्योगधंद्याच्या कामाचे तास दोन महिन्यासाठी कमी करण्यात आले आहेत.
शाळा, महाविद्यालये आणि अत्यावश्यक सेवा पुरविणार्या संस्थांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच कामकाज सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. मोठ्या बाजारपेठाही सकाळी दहा ते संध्याकाळपर्यंत चालू राहतील.
वाहतूक बंदीमुळे सुमारे 20 लाख कार रस्त्यावर धावणार नाहीत. अशा प्रकारच्या प्रतिबंधामुळे सुमारे 40 लाख लोकांना सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा लागणार आहे.
|